Monday, 19 September 2022

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।। 

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच... 

          कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता , पोटात भुकेने सर्वांच्या कावळे ओरडून धिंगाणा घालत होते . आणि  प्रत्यक्षात मात्र कावळा शिवत नव्हता , 
अरे बापाची शेवटची इच्छा काय होती का ? 

    एकजण अगदी कोकलून ओरडला , त्याला भूक लागली असावी बहुतेक पण तो तसा स्पष्ट बोलत नव्हता , नंतर नीट पाहिल्यावर लक्षात आलं कि हा आपलाच सवंगडी , एक पान  गळून पडल्यावर बाकीच्या पानांच्या मनाची तयारी होते कि आता आपण हि असेच गळून पडणार तसच त्याच हि झालं असावं बहुदा असो. मी काय तिथून जायला तयार नव्हतो आणि कावळ्याने हि ठरवलं होत कि आपण शिवायचं म्हणजे शिवायचं , पण तस प्रत्यक्षात होत नव्हतं . 

काळ बदलत जात होता , खऱ्या आयुष्या मधला जिवलग आज पित्र झाला होता ... 

पोराने तस सर्व ताट सायसंगीत भरून ठेवलं होत , आणि टेरेस वर सर्व सजवून ठेवलं होत , जिवंत असताना आपल्या बापाला काय आवडत हे माहित असून कधी कोण देत नाही , आणि आता वर ढगात गेल्यावर जावई पहिल्यांदा सासुरवाडीला गेल्यावर जस आदर तिथ्य होत अगदी तस करतात , आणि आज तरं जरा जास्तच ताट भरून ठेवलं होत ,

  पण आता काय उपयोग म्हणा , धाय मोकलून फक्त नावाला रडले , आता तर तस काहीच वाटत नाही आणि दिसत नाही . वेळ निघून जात होता आणि पोटातले कावळे आता बाहेर येतात कि काय असं लोकांना वाटत होत 
-शेवटी सुनबाई काहीतरी पुटपुटली त्याच्या कानात आणि तो मनातल्या मनात पुटपुटला,
-बाबा मला माफ करा  ,मी तेव्हा तस करायला नको होत , मी माझी पातळी सोडली , 
पण मला त्याची द्या आली नाही , मला त्या खोळंबलेल्या माणसांची दया आली ,  जे थांबले होते  हल्ली कोण एवढं कुणासाठी थांबतय , पण ते थांबले , असो 
कावळा  शिवला एकदाचा नाईलाजास्तव, पण मी मुक्त नव्हतो झालो का मी तृप्त नव्हतो झालो , कारण माझ्या मुलाने मला , माझा त्रास होत होता म्हणून मारलं ... 
शेवटी काकस्पर्श झाला , पण बाप मुक्त झाला नाही. 

मी भटकतोय एखाद्या जिवंत बैचेन  माणसासारखा मुक्ती च्या शोधात , 
आयुष्यात पुण्य किती हि करा पण आपल्या माणसांनी आपली व्यवस्थीत काळजी घेतली तरच आपण या ब्रह्मांडा मधून मुक्त होतो 



लेखन - श्रेयस रघुनंदन रोडे 
तळा -रायगड ८६००२३४६६३

 

Saturday, 19 February 2022

३० फूट दगडातील भव्य शिव प्रतिमा

।। श्री ।।

३० फूट दगडातील भव्य  शिव प्रतिमा 


    रोज काहीतरी विषय घेऊन लिहायचं, पण आज म्हंटल कि आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहूया , खरं म्हणजे महाराजांवर इतकं लिहिलं आहे खूप लेखकांनी , दुर्गप्रेमींनी त्या लिहिलेल्या अथांग सागरात माझे हे २ छोटे थेंब बाकी काही नाही , 

        आज शिवजयंती मी जिथे अगदी पायथ्याशी आम्ही राहतो , गावाचं नाव तळा  , आणि गडाचं नाव तळगड अगदी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आणि शिवजयंतीचे वारे वाहायला सुरुवात झाली , सकाळी तळगडावर जयंती साजरी झाली , अगदी दिवसभर हाच कार्यक्रम डोळे दिपवून टाकणारा कार्यक्रम  

  तळागडाचा इतिहास असा आहे ,  इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वतःकडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपणास समजते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.  

.... आणि आजचा एक वेगळा प्रयोग

आज गो.म.वेदक विद्यामंदिर येथे जवळ जवळ ३ ब्रास खडी मधून ३० फूट महाराजांची प्रतिमा साकारली , यामध्ये श्री.विनोद कोलवणकर सर( चित्रकला शिक्षक )  , श्री.सुहास वावेकर सर ( मराठी शिक्षक ) तसेच शाळेचे आजी माजी विद्यार्थी आकाश शिंदे , कैलास सातांबेकर , योगेश सुतार ,ओमकार कजबजे ,अंजिक्य मुळे, कौस्तुभ मेकडे,राज शिंदे  यांनी हि शिवप्रतिमा साकार करण्यात  मोलाची कामगिरी केली गेले ३ दिवस याची तयारी चालू होती. 

... आणि आजची प्रतिमा 









लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे 

तळा -रायगड 

Monday, 31 January 2022

वय वर्ष ४५

।। श्री ।। 

वय वर्ष ४५ 


    तोच तो नेहमीचा रूट ठरलेला , तेच शेड्युल आणि तिचं ती माणसं , हे सर्व सोडून  मुबंईत जावं  आणि तिथेच स्थयिक व्हावं असं वाटायचं , पण खरा मुंबईकर आता गांधीजींच्या आदर्श घेत म्हणत होता, चला खेड्याकडे पण खेड्यातलाच माणसाला ठाऊक खेडं काय ते ... 

        वय वर्ष ४५ असलेला मी माझ्याच तालुक्याचा MIDC मध्ये काम करत होतो १० हजार मध्ये घेतलेली सेकंड हॅन्ड बाईक दर महिन्याला तिला सजवत होतो. सर्व स्वप्न एका हृदयाच्या कप्यात ठेवली होती. बायकोचा स्पर्श झाला कि मी माझ्या स्वप्नातून बाहेर यायचो आणि तो स्वप्नाचा कप्पा लाजाळू सारखा मिटून जायचा , तिची तरी काय स्वप्न होती म्हणा , वर्षात एखादी साडी घेतली का ती खुश व्हायची , देवाच्या कृपेने एखाद मुलं असत तर ते एक बर झालं असत , पण बरं झालं आम्हाला मुलं झालं नाही ते १५ हजार पगारामध्ये पुन्हा त्या एकाची वाढ झाली असती . आणि त्याला सुद्धा इच्छा मारून जगायला लागलं असत . 


घरात माणूस किती हि ताठ मानेने जगत असला तरी तिथे त्याला आपल्या साहेबासमोर मान खाली करावीच लागते... 


रोज सकाळी ७ ते ७ करणारा मी संध्याकाळी घरी आलो का मेल्यासारखा पडलेला असतो , बायको जेव्हा  पाण्याचा ग्लास घेऊन येते , तेव्हा तिच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहिल्यावर दिवासाचा सर्व थकवा निघून जातो , घरात हि साधं मला काही करू देत नाही पण तिथे मात्र मी वेळेला  टॉयलेट देखील साफ करतो . आज पगार झाला म्हणून तिला साडी घेऊन आलो, पण तीने ती साडी घेताना मला विचारलं तुम्हाला काही घेतलं नाही का ? मी नकारार्थी मान डोलवली , 

उद्या सुट्टी घ्या , एक दिवस आपण फिरायला जाऊ या ! मी तसाच  माझ्या कामावर फोन लावला आणि विचारलं , तर सांगितलं कि अरे उद्या तुला डबल शिफ्ट आहे . 
ते ऐकून बिचारीची हिरमोड झाला , आणि मी पुन्हा माझ्या बारा तासाच्या शिफ्ट ला गेलो माझ्या बायकोचा मूड ऑफ करुन .... वयाच्या ४५ व्या वर्षी 


लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे . 

संकल्पना - सुरभी रवींद्र ठाकूर 



Saturday, 11 December 2021

सर बिपीन रावत (CDS)

।। श्री ।।

 

सर बिपीन रावत (CDS)

 

मी काय लिहिणार या माणसावर , लष्करी सेवेमध्ये एका उच्च पदावर असलेला हा माणूस , सर बिपीन रावत,  मला मिळालेली आणि माझ्या गेल्या दोन दिवसात वाचनात जे आलं ते लिहिण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ....   


जनरल बिपीन रावत PVSM , UYSM , AVSM , YSM , एम , VSM , ADC (L6 मार्क 1958-8 Disnbr 202l) भारतातील पहिले संरक्षण मुख्य किंवा मुख्य संरक्षण कर्मचारी (CDS) आहेत्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद स्वीकारले. याआधी त्यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत भारतीय लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले होते.

बिपिन लक्ष्मण सिंग रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी उत्तर प्रदेशातील गढवाल जिल्ह्यातील पौरी (आता पौरी गढवाल जिल्हा , उत्तराखंड ) येथे झाला .  त्यांचे कुटुंब भारतीय सैन्यात अनेक पिढ्यांपासून सेवा करत होते. त्यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत पौरी गढवाल जिल्ह्यातील सैंजी गावचे होते आणि लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले होते.  त्यांची आई उत्तरकाशी जिल्ह्यातील होती आणि उत्तरकाशी विधानसभेचे आमदार किशन सिंग परमार यांची मुलगी होती. ]

जनरल रावत यांचे सुरुवातीचे शिक्षण डेहराडूनमधील कॅंब्रियन हॉल स्कूल आणि शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले.  यानंतर ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत रुजू झाले . त्यानंतर रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमी , डेहराडून येथून प्रथम श्रेणीची पदवी प्राप्त केली आणि येथे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले 

रावत यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनमधून ग्रॅज्युएशन केले आणि 1997 मध्ये युनायटेड स्टेट्स आर्मी कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेज, फोर्ट लीव्हनवर्थ, कॅन्सस येथून पदवी प्राप्त केली.  नंतर, रावत यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासात एम.फिल केले पदवी आणि व्यवस्थापन आणि संगणक अभ्यासात डिप्लोमा देखील प्राप्त केला. 2011 मध्येत्यांना चौधरी चरण सिंग विद्यापीठाकडून लष्करी माध्यम अभ्यासाच्या क्षेत्रातील संशोधनासाठी मानद पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. 

 


 

जनरल रावत यांनी 1978 मध्ये अकराव्या गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 

·         जानेवारी १९७९ मध्ये मिझोराममध्ये सैन्यात पहिली नियुक्ती मिळाली.

·         नेफा परिसरात तैनात असताना त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले.

·         कॉंगो साठी यूएन 'च्या पिसकिपिंग फोर्स घेऊन जाणार.

·         त्यांनी 01 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

·         31 डिसेंबर 2016 रोजी लष्करप्रमुख पद.

 

अशा या भारतमातेच्या पुत्राचे निधन झाले , त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि १३ सहकारी यांचे हि निधन झाले ,

 8 डिसेंबर 2021 रोजी, जनरल रावत, त्यांची पत्नी आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचार्‍यांसह एकूण 10 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य भारतीय हवाई दलाच्या एमआय -17 हेलिकॉप्टरमध्ये होते ज्याने सुलुरू हवाई दलाच्या विमानतळावरून संरक्षणासाठी उड्डाण केले होते. वेलिंग्टन येथील सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जनरल रावत व्याख्यान देणार होते.
 सुमारे 12:10 p.m. स्थानिक वेळ , अपघात Bandishola ग्रामपंचायत मध्ये स्थित एक खाजगी चहा बाग एक निवासी वसाहत जवळ आली च्या कूनूर मध्ये तालुक्यात नीलगिरि जिल्हा . हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी उतरणार होते तिथून अपघाताची जागा अंदाजे १० किमी अंतरावर होती. जनरल रावत - आणि त्यांच्या पत्नीसह इतर 11 जणांच्या मृत्यूची नंतर भारतीय हवाई दलाने पुष्टी केली. या अपघातात भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले आहेत.  मृत्यूसमयी रावत ६३ वर्षांचे होते. 


शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी, जनरल रावत यांचे अंत्यसंस्कार बेरार चौकात झाले, हिंदू रीतिरिवाजानुसार संपूर्ण लष्करी सन्मानासह 17 तोफांची सलामी दिली गेली.

 

 साभार - गुगल , 

संदर्भ - विकिपीडिया 

लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे . 

 

Sunday, 8 August 2021

शरीर सुन्न झालंय

।। श्री ।।



शरीर सुन्न झालंय 

अरे आओ ना , म्हणणारी ती आज भेटली मला तिच्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा खूप होती मनात पण ती व्यक्त होईल का याची , जरा मला शाश्वती नव्हती इतकंच , तिच्या भूतकाळातून ती वतर्माना मध्ये केव्हाच आली होती , पण तिला तिच्या भविष्याची चिंता होती ,तिचा भूतकाळ तिला सलत होता. 
         आम्ही भेटलो , आणि कुठल्यातरी शांत ठिकाणी जाऊ असं ती म्हणाली , मी म्हटलं ठीक आहे , आम्ही बस  मध्ये बसलो , जरा जास्तच गर्दी होती बस मध्ये मी म्हणालो गर्दी आहे खूप , पण ती म्हणाली अरे सवय आहे मला या गर्दीची आणि या वर्दळीची, आम्ही चढलो आणि अचानक एका मुलीला एका व्यक्तींचा चुकून हात लागला, तर ती मुलगी जवळ जवळ त्याला मारायला च गेली , हिने स्मित हास्य देऊन त्या कडे दुर्लक्ष केलं , आणि अचानक हिला देखील जाणून बुजून हात लावला हे तिच्या हि लक्षात आलं आणि माझ्या हि लक्षात आल. पण एवढा हात लावून हि काहीच  बोलली नाही .  
        तिकडच्या इतक्या लोकांमध्ये फक्त मलाच हीचा भूतकाळ माहित होता . आम्ही आता उतरलो आणि एका शांत ठिकाणी जाऊन बसलो , लिपस्टिक सतत लावून तिचे ओठ काळे पडले होते . शरीराच दर्शन देऊन तिचं शरीर आता वेगळंच वाटतं होत . परिस्थिती अभावी तिला हे करायला भाग पडलं होत . पण वेळेतच तिने तिचा मार्ग बदलला होता. आमचं बोलणं चालू होत , पण तिला मी त्या अवस्थेत पाहिल्यामुळे सतत माझ्या डोळ्यासमोर जुनी तीच येत होती . तिची ती शिवरी भाषा आता कोमल शब्दात मला रुचत नव्हती आणि असं तिच्या मनातलं जाणून घेणारा मी हा पहिलाच होतो . मी हि त्या लोका मधलाच होतो . पण मी एक हिचा मित्र होतो . 
तो एक सुन्न करणारा अनोळखी स्पर्श 
तिला विचारलं मी , मगाशी बस मध्ये तुला तो स्पर्श वेगळा नाही जाणवला का ?  मग तू काही बोलली का नाहीस . 
ती म्हणाली शरीर सुन्न झालय , 
आणि ती उठून निघून गेली , तिच्या भविष्याकडे 


<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8024637492767180"
     crossorigin="anonymous"></script>


लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे ... 
                तळा - रायगड 
चित्र - सिद्धेश अनंत कदम ... 






 

Sunday, 20 June 2021

# "द फ्लाइंग शीख"

।।  श्री  ।।

"द फ्लाइंग शीख" 

दिनांक १८ जून २०२१ रोजी भारताचा एक हिरा निखळला, 

मिल्खा सिंग एक भारतीय धावपटू होते , रोमच्या १९६० उन्हाळी ऑलम्पिक आणि टोकियो च्या १९६४ उन्हाळी ऑलम्पिक मध्ये भारत उपस्थित होते . त्यांना "द फ्लाइंग शीख"  टोपणनाव देण्यात आले. ते भारतातील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होते . मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ गोविंदपूर मध्ये झाला . ते शीख जाट कुटूंबातले होते मिल्खासिंग सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करत राहिले  आणि शेवटी १९५२ मध्ये त्यांना  सैन्याच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत जाण्यात यश आले. एकदा त्याचा सशस्त्र सेना प्रशिक्षक, हवालदार गुरुदेव सिंह यांनी त्यांना धावण्याची प्रेरणा दिली, तेव्हापासून त्यांनी कठोर परिश्रमांनी सराव सुरू केला. १९५६ मध्ये पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ते  चर्चेत आले होते . आशादायक धावपटू म्हणून नावलौकिक मिळविल्यानंतर, त्यांनी २०० मिटर आणि ४०० मीटरचा यशस्वीरित्या धाव घेतली, आणि त्यामुळे भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी धावपटू ठरला. काही काळ ते  ४०० मीटरचा जागतिक विक्रम धारक देखील होते . युनायटेड किंगडममधील कार्डिफ, वेल्स येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर शीख म्हणून लांब केस असलेले पदक स्वीकारले तेव्हा संपूर्ण क्रीडा जगाला त्याची ओळख झाली. त्याच वेळी, त्याला पाकिस्तानमध्ये धावण्याचे आमंत्रण देण्यात आले होते, परंतु बालपणातील घटनांमुळे तो तेथे जाण्यास तयार नव्हता. परंतु राजकीय उलथापालथच्या भीतीमुळे त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. त्याने धावण्याचे आमंत्रण स्वीकारले. शर्यतीत, मिल्खा सिंगने आपले प्रतिस्पर्धी सहजतेने मोडले आणि सहज विजय मिळविला. बहुतेक मुस्लिम प्रेक्षक इतके प्रभावित झाले की बुरखशीन स्त्रियांनीदेखील हे मोठे धावपटू पाहण्यासाठी मास्क काढून टाकले, तेव्हापासून त्याला फ्लाइंग शीख ही पदवी मिळाली.  

क्रीडा रेकॉर्ड, पुरस्कार

  • 1958 राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले.
  • 1958 च्या एशियन गेम्सच्या 400 मीटर शर्यतीत - प्रथम
  • 1962 च्या एशियन गेम्सच्या 400 मीटर शर्यतीत - प्रथम
  • 1962 एशियन गेम्सच्या 4 * 400 रिले शर्यतीत - प्रथम

  • 1964 च्या कलकत्ता नॅशनल गेम्सच्या 400 मीटर शर्यतीत - दुसरा




"द फ्लाइंग शीख" 

या धावपटूला भावपूर्ण श्रद्धांजली .... 



लेखन - श्रेयस रघुनंदन रोडे 
चित्र -  सिद्धेश अनंत कदम 

संदर्भ - गुगल , विकिपीडिया ... 


 मागील ब्लॉग नक्की वाचा ... 

http://rode2.blogspot.com/2021/05/blog-post.html


http://rode2.blogspot.com/2021/04/blog-post.html

Tuesday, 4 May 2021

तो आज मुक्त होता ...

।।श्री।। 

तो  आज मुक्त होता ... 


                


                आज मला कुणीच अडवलं नाही , मुक्त होतो आज मी आज माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती कि मला आज बाजूला लावतील , माझ्या मालकाला त्रास देतील , रोज जस मी काम करायचो तसाच आजही करणार होतो , पण आजच काम रोजच्या कामापेक्षा खूप वेगळं होत , रोज थकून जाणारा मी आज हे काम करताना आनंदी होतो , आज एक वेगळं आणि महत्वाचे कार्य माझ्या कडूंन घडणार होत, स्वतः ला खूप  भाग्यवान समजत होतो कारण आज मला दिली जाणारी वागणूक हि स्पेशल होती , 
                माझा मालक हि खुशीत होता त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद होता , आम्ही निघालो , मला मागे टाकणारी आज माझ्या कडेच पाहत होती , मला पुढे पाठवत होती , माझ्या सारखे बाकीचे होते पण त्यांना ती वागणूक नव्हती, कारण मी लिक्वीड ऑक्सिजन घेऊन जात होतो , माझ्या मागे पुढे पोलिसांचा ताफा होता आणि मधोमध मी होतो .  
            हो  कळलं असेल तुम्हाला मी कोण ते ... 
मी एक टँकर बोलतोय , रोज वेगळी द्रव्य नेणारा मी आज हा ऑक्सिजन नेतोय ... बोलण्याचं कारण एवढंच
रोज आणि आज जो मला फरक जाणवला तोच ... 
काही ठिकाणी मला अडवलं माझ्या वरून भाडंन झाली , ज्याने पाहिलं असेल त्याला हे नक्की कळेल ... 
लेखन - श्रेयस रघुनंदन रोडे.  
तळा - रायगड 
चित्र - सुरभी रविंद्र ठाकूर .

Monday, 26 April 2021

झालं असं त्या रात्री

।। श्री ।।
झालं असं त्या रात्री 

                                वेळ रात्री ८. ३० ची होती २३ एप्रिल २०२१ आता तुम्ही म्हणाल २३ एप्रिल च्या रात्री च आता काय आहे . पण जरा त्या गोष्टीचा सविस्तर अभ्यास करावा  लागतो . तर झालं असं त्या रात्री चंद्राभोवती एक रिंगण दिसत होत सोसिअल  मीडिया वर त्याचीच  चर्चा पण एक होत काही काळ त्या रिंगणामुळे कोरोना गारठला होता . पण तो  तेवढ्यापुरता ,
        प्रत्येकाला त्या रात्री त्याची माहिती मिळालीच ,  पण  आणखी माहिती मिळाली तर त्यात वाचणाऱ्याचं काय नुकसान नाही आणि लिहिणाऱ्याच हि काही नुकसान नाही , अर्थात माझं हि काही नुकसान नाही आणि  तुमचं हि काही नुकसान नाही . 
            
            तर काय आहे २२डिग्री हॉलो . 
                                            हे एक ऑप्टिकल इंद्रियगोचर आहे , जो आईस - क्रिस्टल हॉलोसच्या कुतुबणाशी संबंधित आहे , त्याचे स्वरूप सूर्य किंवा चंद्राच्या आसपास अंदाजे २२ डिग्री त्रिज्यासह एक अंगठी आहे . जेव्हा चंद्राभोवती  हवामान होते , मुनरिंग किंवा हिवाळ्यातील हॉलो म्हणतात .   

याची निर्मिती 
                    जरी हा हॉलोचा सरावात सामान्य प्रकार असला तरीही २२ डिग्री हॉलो साठी जबाबदार असलेला बर्फाचा  क्रिस्टलचे नेमके आकार आणि दिशा चित्रण हा चर्चेचा विषय आहे .  त्याचा आकार हा षट्कोनी असतो , 
वैकल्पिक स्पष्टकरणामध्ये बुलेट - आकाराच्या बर्फ स्तंभाच्या  क्रिस्टल  क्रिस्टलचा सहभाग समाविष्ट आहे. 

            ढगांमधील बर्फाचे स्फटीका सर्वच प्रकाश सारख्या प्रकारे विचलित करतात, परंतु केवळ २२डिग्री अंशावर असलेला निरीक्षणाच्या परिणामास ते योगदान देतात. २२ डिग्री पेक्षा कमी कोनातून हि प्रकाश अपवर्तित  होत नसल्यामुळे प्रभागात अकाश गडद होते.  
  


हवामान 

चंद्राच्या रिंग्ज वादळ जवळ येण्याचा इशारा देतात. इतर बर्फाच्या प्रभागांप्रमाणेच, 22 ° हलोज दिसतात 
जेव्हा आकाश पातळ सिरस किंवा सिरोस्ट्रॅटस ढगांनी व्यापलेले असते जे बर्‍याचदा मोठ्या वादळाच्या 
समोर काही दिवस आधी येते.


साभार -  गुगल 
लेखन -  श्रेयस रघुनंदन रोडे . 
                तळा -रायगड 
छायाचित्र - कुणाल काळे 
    

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...