Saturday, 30 May 2020

बघे ...

।। श्री ।।

बघे ... 


हि एक माणसाची जात आहे हा प्रकार तुम्हाला जास्त करून अपघात , मारामारी , कोण अडचणीत असेल असा ठिकाणी पहायला मिळतो हे जे सोशल मिडिया आहे ना ते ह्याच्याच जिवावर  चाललेलं आहे . आता आपल्या मुळ विषयाकडे वळुया बघे  .... 
आज सकाळी टीव्ही लावला  , तर Bulletin मध्ये पहिलीच बातमी ,ते चित्र सांगतो कस होत , कारण सकाळी अशी बातमी पहिली आणि काळीज हेलावून गेल गहिवरून आलं, एक माय आपल्या दोन मुलासोबत रेल्वेस्टेशन मध्ये थांबली होती, ती माउली किती दिवस उपाशी होती नाही माहित , पण त्या बिचारीला भूक अनावर झाली नाही , आणि तिचा जिंव भुकेने गेला , आपली आई झोपली आहे अस त्या निरागस चेहऱ्याला वाटत होत , म्हणून ते तिच्या जवळ खेळत होत, पण त्या निरागस जीवाला काय माहित ती माउली तिथे फक्त शरीराने आहे, आणि त्यांना सोडून ती खूप दूर गेली आहे , 
त्या माउलीला काय वाटल असेल , तिची लेकर आता उघड्यावर पडली , आणि बघ्यांनी फक्त बघायचं काम केल , 


किती आहे किंमत गरीबाची त्याच्या मरणाची | बघे बनू नका | जागे व्हा.




आज हे लिहिण्याच कारण अस कि माझ्या सोबत हि घटना घडली ... मी जिथे राहतो तिथेच खाली एक मन्दिर आहे ,  मंदिराच्या खालच्या बाजूला पूर्ण कातळ आहे , झाल अस एक दारू पिऊन बसलेला माणूस त्याचा  तोल गेला आणि सरळ दोन कातळाच्या मध्ये अडकला मी हि पाय मोकळे करायला  गेलो  होतो तर घरी येत होतो , माझा मित्र गाडीवरून त्याच्या घरी जात होता , तो माणूस जेव्हा पडला तेव्हा तिथे काही मोजके बघे होते , पण कुणीही त्याच्या कडे लक्ष दिल नाही माझा ,मित्र  म्हणला अरे वरून एक माणूस खाली आला मध्ये अडकलाय सगळे  बघत होते , पण कुणी लक्ष द्यायला तयार नाही , आम्ही गेल्यावर त्याला काढण्याचा प्रयत्न करत होतो , पण त्याला अति दारू मुळे आकडी येत होती. एकाला थाबंवल मदतीसाठी पण तो एक जातिवंत बघ्या निघाला ...  आम्ही बोलत होतो पोलिसांना फोन करू मग काढू , तर तो महाशय म्हणतो कशा त्याना फोन केला तर आपण अडकू,  कीव आली मला त्याची म्हणालो त्याला कि बाबा जा तू ,. तो भविष्यात  फक्त बघ्याची भूमिका करणार , नंतर सर्व माप काढायला आले , पण ती माप बघ्यांनी जास्त वेळ काढलीच नाही कारण आमचे पोलिस बांधव लगेच आले. त्याला आकडी येत होती , पोलिस आल्यामुळे जी काय बाजूच्या  कार्यालयातील  शिपाई वर्गांनी त्याला वर काढल. तो जिथला कुठला होता त्याला त्याच्या घरी नेण्यात आल. 
सांगण्याचा , लिहिण्याचा मतितार्थ इतकाच आम्ही बघत बसलो असतो तर त्याचा जीव गेला असता , 
 मान्य आहे तो दारू पियाला होता , पण त्याला तिथून बाहेर काढणं गरजेचं होत , 
दुर्दव्य त्याच तो सोशल मिडीयावर व्हिडीओ मार्फत नाही गेला . या बघ्याच  हे काम महत्त्वाचं असते , ते मात्र ते विसरले ... 

वरील व्हीडीओ लिंक - कुणाल काळे 
लॆखन - श्रेयश रघुनंदन रोडे ... 
 तळा -  रायगड 
 मो- ८६००२३४६६३ 










Sunday, 24 May 2020

रमजान ... ईद


 ।।श्री।।

रमजान ... ईद



सर्व प्रथम सर्वाना रमजान ईद च्या मनःपूर्वक  शुभेच्छा 
मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपुर्ण सण म्हणजे ईद उल फितर , व दुसरी ईदुज्जुह . 
 ईद उल फितर ईद हि आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते, आपापसात बंधुत्वाचे सबंध प्रस्तापित करू प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी याची ओळख आहे , मात्र या उलट ईदुज्जुह कुर्बानी व त्यागाचं पर्व मानलं जात ... 

आपण  ईद उल फितर ईद या विषयी वाचू कारण आता जी येत आहे ती हि ईद आहे
या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना अलिगन देतातनवनवीन पोशाख परिधान केले  जातात ,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद असतो. 
प्रत्येक धर्माचे एक धर्मगुरू असतात तसेच या मुस्लिम धर्माचे धर्मगुरू हजरत महंमद पैगंबर ... 
 ईद -ए -मिलाद म्हणजे 'अल्लाह ' चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस
हजरत अली म्हणतात ...
" जिस दिन आप कोई गुन्हा न करे ओ दिन ईद हे " 

मक्का मदिना ....

ईद या शब्दाचा अर्थ  आनंद , तर फितर म्हणजे दान करणे , अन्नाच्या स्वरूपात दान केले जात , फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे . 
हा रमजान महिना ... यामध्ये मुस्लिम बांधवाचे रोझे (उपवास ) असतात. 

मात्र आताच्या या आलेल्या संकटामुळे रमजान ईद ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही , रमजान ईद च्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना अलिगन देतात , पण या वेळेस अलिगन नाही देता आले , तरी आपला मुश्लीम बांधव अल्लाह कडे प्रार्थना नक्कीच करेल
मध्ये एकदा वाचण्यात आल होत कि वैज्ञानिकांनी असं संशोधन केलं , कि जर सलग ३० ते ४० दिवस दिवसातून १२ तास काही खाल्लं नाही तर आपल्या शरीरातील जे काय विषाणू असतील ते नाहीशे होतात ,
या गरम दिवसा मध्ये माझा मुस्लिम बांधव १२ तास काही खाता न पिता उपवास धरतो ....
ये मान लेते है चांद कि रोशनी हमें  एक दुसरे के गले लग रही हे 

सण जरी धर्माचा असला तरी उत्सव हा नात्याचा असतो  आणि त्यातील माणसाचा असतो .... 

चित्र - सिद्धेश अनंत कदम 
विषेश सहकार्य - कल्पेश कदम , कुणाल काळे 
लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे ... 
   तळा -रायगड -महाराष्ट्र  
मो. ८६००२३४६६३


Tuesday, 19 May 2020

कोरोना युद्धातील सेनापती मात्र दुर्लक्षित ...


     ।। श्री ।।

कोरोना युद्धातील सेनापती मात्र दुर्लक्षित ... 

    आताच्या या बदललेल्या जीवनात आणि मुळात म्हणजे कोरोना सारख्या या महामारीच्या काळात जगावर खूप मोठं संकट आलेले  असताना ... सगळे आपापल्या घरात बंद आहोत ,पण एक व्यक्ती अजूनहि घरी गेलेली  नाही . 
                    मी एकच व्यक्ती म्हणेन कारण माणूस हा एकच आहे . आत्मे वेगवेगळे असले तरी , मग तो पोलीस असो , एक सफाई कामगार असो किंवा मग एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट असो , म्हणून म्हटलं कि एक व्यक्ती . 
  ती  व्यक्ती एखाद्या सेनापती सारखी  लढत आहे , जागतिकस्तरावर चालू असलेला लढाईचा तो भाग आहे .
   मात्र एक गोष्ट निदर्शनात आलीच ती  म्हणजे आदर , मान  ,सन्मान अहो एखाद्या सेनापतीला हे  सर्व मिळतच, पण  एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट , याना हे काहीच मिळत नाही ,नको मिळु द्या ते काय मान ,सन्मानासाठी एवढे भुकेलेले नाहीत , पण त्याच्यांकडे  दुर्लक्ष तरी नका करू ... 
 मधल्या काळात इंदोर येथे   डॉक्टर वर हल्ला झाला .... अरे ते या क्षणाला देवदूताचं काम करतात त्याच्यावर हल्ले कसले करताय .... 
    वेळ काय प्रसंग काय आपण करतोय काय कशाच कोणाला गांभीर्य  नाही ... 

राष्ट्र विजयी हो हमारा ...
सर्वाना मानाचा मनापासुन मुजरा एक सफाई कामगार , आमचे पोलीस बांधव आणि डॉक्टर ( देवदूत )

हिम्मत लागते कोरोनाच्या रुग्णाच्या   घशाचा swab  घ्यायला आहे का कोणात एवढी हिंम्मत , पण ते एक   डॉक्टरच   करू शकतो . हिम्मत लागते त्या रुग्णाला इंजेक्शन ,सलाईन लावायला , ते काम फक्त नर्सच करू शकते , 
  माझं तर ठाम मत आहे , हे देशाचं जागतिक पातळीवरील युद्ध आहे आणि यामध्ये खरा सैनिक खरा जवान  हा एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट,एक पोलीस आणि एक सफाई कामगार आहे.  जशी एखाद्या सैनिकांना बुलेट प्रूफ जॅकेट ची गरज असते ना तशीच माझ्या या जवानांना PPE किट सारख्या गोष्टीची गरज आहे . पण असो त्याना एक PPEकिट  नाही भेटला तरी चालेल , पण देश जनता व मानव सभ्यतेच्या रक्षाणासाठी ते सुसज्ज  आहेत आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे  काळजी घेणे ,आता PPEकिट  ची  केले सुविधा पण जरा उशीरच झाला. 
त्याच्यावर दुर्लक्ष करणे म्हणजे हि त्यांची काळजी नाही ? 
   वेगवेगळ्या बातम्या येतात , कोरोना विषयी पण त्या बातमीत एखादा डॉक्टर , एखादा पोलीस , एखादी नर्स असले ना कि वाईट वाटतं , कारण तो माणूस आपल्या साठी झटतो आहे . 
अजूनही काही काही डॉक्टर , फार्मासिस्ट  अजून आपल्या घरी गेले नाहीत , यामध्ये एक स्त्री देखील आहे मग ती डॉक्टर असो , एक फार्मासिस्ट असो , एक पोलीस असो , किंवा मग एक नर्स असो त्या माउलीला देखील तिचा संसार आहे प्रपंच आहे , पण तो सर्व सोडून देशासाठी आणि आपल्या साठी ती थांबली आहे ... 
आज हे आहेत म्हणून आपण आहोत .... 
एक सलाम तुम्ही करत असलेल्या कामाला 

सर्व सेनापती आपापल्या क्षेत्रामधला डॉक्टर, फार्मासिस्ट , पोलीस, नर्स , सफाई कामगार ... 
एवढं जोखमीचं काम फक्त हिच माणसं  करू शकतात ... 
प्रत्येक काम हे पैशासाठी नसत राव , त्याना सुद्धा सुट्ट्या आहेत ... 




चित्र  १  - सिद्धेश अंनत कदम 
चित्र  २ - कल्पेश काशिनाथ कदम 
विशेष सहकार्य - कुणाल काळे 
लॆखन - श्रेयश रघुनंदन रोडे . 
 तळा -रायगड  मो - ८६००२३४६६३

दिनांक - १९ मे २०२० 


 

Sunday, 17 May 2020

इंडिया आणि भारत ...

                                                                          ।।श्री।।

                                                                   इंडिया आणि भारत ... 
         
           किती दूर जावे , कुठे थांबावे , काय करावे , सुचत नाही,  असच आजच्या  मजुराचं झालाय , कितीही चालला तरी रस्ता संपत नाही .तो वाढत  चाललाय . कधी कधी मला अभिमान वाटतो कि, माझाच  देश आहे , त्याला दोन नाव आहेत , एक भारत आणि दुसरं इंडिया ...
    नाण्याला जशा दोन बाजू असतात ना , तशाच या दोन बाजू आहेत , भारत म्हणजे माझा सुजलाम सुफलाम  असा , आणि इंडियन म्हणजे , माझ्या भारतामधला कुणीतरी एक दुसऱ्या देशात जाऊन त्याची प्रगती करतो तो  म्हणजेच इंडियन ...
      दोन्ही हि खूप चांगलं काम करणारे , एक भारतीय हरित क्रांतीचा जनक तर Nuclear Test करणारा  ... एक इंडियन .
          दोन्ही आपल्या देशाचा फायदा करणारे , देशसेवा करणारे .

डिसेंबर २०१९ ( कोविड -१९) याने जन्म घेतला , सुरुवातीला काहीच वाटलं नाही , पण नंतर ह्याने भस्म्या झाला सारखं सर्व गिळंकृत केलं ,
  बाहेरच्या इंडियन ना आता माझ्या भारताची आठवण येऊ लागली , ते विमानाने आले , माझ्या देशात पण माझा भारतीय हा पायी चालत जाऊ लागला . माझ्या महारष्ट्रातून इतर राज्यात जाणारे मजूर खूप होते , पण एक इंडियन म्हणून बाहरेच्या देशात गेलेले भारतीय हे त्याहून आधिक होते ...

आजची परिस्थिती ... एक बोलकं चित्र ... खूप सांगून जातेय ....
चित्र - सिद्धेश अंनत कदम ... 
                 त्यात हा रोग , महामारी सपूंर्ण विश्वात पसरली ,  एका युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाले . प्रत्येक इंडियन आपल्या भारतात येणे त्याला आणणे हे आपलं कर्तव्य नव्हे तर आपली जबाबदारी आहे .
आपल्या इंडियन हा बाहेरगावी  आहे , त्याना आणण्यासाठी विनामूल्य मदत केली जाते , आणि दुसरीकडे भारतीय  श्रमिक गरिब बांधवाना गावी नेण्यासाठी राज्य सरकार केंद्रसरकार कडे १५% ने वाद घालते. 
            आता सोडल्यात  गाडया प्रत्येक राज्यात  पण खूप उशीर झाला ....
      नुकतीच काही दिवसापूर्वी औरंगाबाद मध्ये घडलेली  घटना अगदी ताज उदाहरण , या घटनेमध्ये आपापला फायदा पाहून काही जण आपलं मत व्य्क्त करत बसले . तर काही जण त्या मजुरांना दोष देत बसले .
 जर का त्या मजुरांना , मदत केली असती , जर का आश्रय दिला असता या, समाजसेवी संस्थानी  त्याच्या परीने काही केलं असत तर कदाचित हि दुर्घटना घडली नसती ....
शेवटी जर तर चा विषय ...

पण आज मी किंवा तुम्ही हे वाचत असताना हजारो मजूर कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात असतील तो मार्ग आपलंही असू शकतो तर त्याना आराम करण्यासाठी जागा द्या ...
 विचार करण्याची बाब म्हणजे परदेशांत कुठेतरी हा व्हायरस तयार होतो ... विमानाने तो भारतात येतो आणि या सगळ्यचा परिणाम भोगतोय कोण ..... तर एक भारतीय आणि भारतातून बाहेर गेलेला एक इंडियन ....

त्याचा परिणाम होतोय कुणावर यर एका भारतीयांवर  .... आणि एका बाहेरगावरून आलेल्या इंडियन वर ....



चित्र - सिद्धेश अनंत कदम .
विशेष सहकार्य - कुणाल काळे
 लॆखन - श्रेयश रघुनंदन रोडे ....
  तळा -रायगड  मो - ८६००२३४६६३







दिनांक - १७-०५-२०२०





काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...