Tuesday, 30 June 2020

बा विठ्ठला

।। श्री ।।

   || बा विठ्ठला || 


मी वारकरी बोलतोय ... 
तुका म्हणे तु आकाशा एवढा , विठ्ठला  २८ युग तु  विठेवर हात कंबरेवर ठेवून उभा आहेस , मात्र या २८ युगात असं कदाचित पहिल्यांदा झालं असेल कि तू देवा गाभाऱ्यामध्ये बंद आहेस तुझ्या मंदिराचे दरवाजे बंद आहेत . 
तुझी पुजा करायला सरकारी बडवे आहेत , पण देवा माणसाचं दर्शन तुला आणि देवाचं दर्शन माणसाला या वेळी जास्त करताच आलं नाही , 
तु आकाशा एवढा आहेस यात शंकाच नाही , पण ह्या  आषाढीत मी  तुझ्या दारी येऊन तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवणार होतो त्याच काय ....
एक महामारी आली काय आणि तिने आम्हाला तुझ्या पासून दूर केलं काय , आमचं तर ठीक आहे रे आम्ही माणस आहोत पण तु तर देव आहेस रे तु हि यामध्ये अडकलास , तुझ्या दर्शनासाठी आषाढीची वाट पाहत होतो मी आणि माझ्या सारखे अनेक , पण आजच चित्र वेगळं आहे रे देवा ,  
शांत मूर्ती देवा तुझी हात करकटी वरी तुझे,
भाळी अभीर चंदनाचा बुक्का रूप ते विलोभनीय दिसे .
 बा विठ्ठला 
देवा प्रत्येक वारकऱ्याला आता  आठवतंय  ते तुझ्या दारी येताना आम्ही केलेला हरिनामाचा कल्लोळ , ते रिंगण माउलींचा अश्व , तुकोबांचा आश्व आणि प्रत्येक ठिकाणच आदरातिथ्य माउली माउली म्हणत समोरच्या त्या अनोळखी माणसात तुला पाहून एक गोड  मिठी मारणं आणि शेवट तुझं दर्शन घेतल्यावर होणारा परमानंद ...  
हे सर्व पुन्हा अनुभवायचं होत रे आम्हाला ... 

साभार -  गुगल 
त्या Dj वर जेवढी नाचायला मजा येत नाही ना तेवढी देवा तुझ्या नामात दंग असलेल्या टाळ , मृदुगांवर आम्ही दंग होऊन नाचतो , पांडुरंगा वारीत आम्ही जेव्हा पायी चालत असतो ना तेव्हा आम्हाला थकवा जाणवत नाही रे का तर आम्हाला तुझ्या दर्शनाची ओढ असते , पण ते सर्व मुकल बघ या वर्षी ... 
विठ्ठला तुझ्या या वारीच्या प्रवासात अनेक स्वभावाची माणसं असतात त्या स्वभावात एखादा भुरटा चोर पण असतो , पण तुझ्या चरणावर त्याने मस्तक टेकलं कि तो इतका आनंदी होतो कि तो आनंद त्याला त्या चोरीत दिसेनासा होतो , देवा या तुझ्या दर्शनाचा फायदा इतका होतो कि तो सुधारतो , चांगली कर्म करू लागतो  हि ताकद तुझ्या दर्शनात आहे ... 
दर्शनात झालो दंग तुझ्या पांडुरंगा
कणाकणात दिसती मजला तुझ्याच  पाऊलखुणा
बा विठ्ठला 
संत ज्ञानोबा, संत  तुकाराम ,संत नामदेव , संत एकनाथ ,संत सोपानदेव , संत मुक्ताई ,संत चोखामेळा ,संत नरहरी सोनार , संत गोरोबा काका आदी संत होऊन गेले , या सर्वांचा तु एकटा BOSS आहेस देवा ... जेव्हा विठोबा रखमाई  असं नामघोष जेव्हा आमच्या ओठी येतो ना तेव्हा अंगावर रोमांच उठतात , ते शब्दात नाही व्यक्त करू शकत ... 
आता तू म्हणशील माझं दर्शन काय तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरात घ्या तिथे माझी तुम्ही पूजा करा , आम्ही करू रे इथे तुझी पूजा पण शेवटी पंढरपूर चा पांडुरंग तो पंढरपूरचाच पांडुरंग ... 
तुझी ओढ लागली मला, मी एक तुझा वारकरी साधा ...
येथूनच दर्शन घेतो मी विठुराया
बा विठ्ठला 

देवा 
चंद्रभागा हि सुखावली आता ,
पुंडलिक आला दारी तुझ्या . 
दार उघडा विठ्ठल राया , 
लेकरं आली नगरा आपुल्या 
तु नाही उघडणार दार तुझं हे ठाऊक आहे आम्हाला ... एक वारकरी किती तुझ्या सोबत बोलू शकतो हे तू ऐकलंस पांडुरंगा ... 
या आषाढी ला तुझी रखमाई स्वतः येईल तुला भेटायला एकत्र असाल उभे विटेवर तुम्ही पांडुरंगा ... 
साभार - गुगल ( FACEBOOK )

  मला देवा एवढंच कळत जळी स्थळी पाषाणी तू आहेस , या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तुझ्या पंढरपूर नगरीत नक्की येणार ... बा विठ्ठला 




दिनांक - ३०/०६/२०२० 

चित्र  १ - सिद्धेश अनंत कदम 
चित्र  २ -  कल्पेश काशिनाथ कदम 
चित्र  ३ - सुरभी रवींद्र ठाकूर 
लेखन -  श्रेयस रघुनंदन रोडे 
             तळा - रायगड - महाराष्ट्र 
              मो - ८६००२३४६६३ 


























































काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...