Friday, 7 August 2020

'तो' जेव्हा जागा झाला ...


।। श्री ।।

'तो' जेव्हा जागा झाला ...


             मी ... मला या अगोदर नावानिशी ओळखायचे अमुक अमुक गावचा तमुक तमुक ... पण नंतर ती ओळख एका प्रसंगा नंतर बेपत्ता झाली . 
 आणून ठेवलं गेलं मला एका बेवारस खोली मध्ये , मी काही क्षणात बेवारस झालो होतो , हे माझं दुर्दैव , गावाकडं जवळ जवळ एकर जमीन  एकर म्हणजे दहा एकर पेक्षा जास्त बर ... पण त्या गावाकडच्या जमिनीचा त्या पोराबाळांचा काही उपयोग नव्हता , मला जेव्हा सोडवायची वेळ आली , तेव्हा मात्र एक हि नाही आल मला सोडवायला ...
  पुर्वी म्हणायचे माणसाचा आत्मा तृप्त  नसेल तर तो भटकत राहतो आणि भूत म्हणून वावरायला लागतो . 
माझ्या सारखे किती तरी आत्मे मुक्त झाले असतील , कदाचित पण पृथ्वीवर आलेल्या या भयंकर महामारीने आज माझ्या निपचित पडलेल्या देहात कुठेतरी आत्मा जागा केलाय आणि  म्हणून मी तुमच्याशी बॊलतोय ... 
शांत झाला देह , निघून गेला जीव ...
या देहाने काय सोसलं ते कुणास आहे ठाव ,
नाही झाली राख , नाही झाला त्रास ,
सुखदुःखाचा वारा घेऊन गेला सार ,
आता उरलाय फक्त एक पारदर्शी आत्मा ... 

  मी त्या मृत खोलीमधला मुडदा बोलतोय , ना ओळख असलेला ना आता कुणाचा पालक असलेला , असा मी एक बेवारस मुडदा... आता माझ्याजवळ होत तरी काय , काहीच नाही , फक्त एक मृत शरीर , आणि माझा पारदर्शक आत्मा . 
 या शवविच्छेदन खोलीत येऊन खूप काही शिकलो बुवा पण , शिकलो म्हणजे हेच ... 
तुमचं Social Distancing  ... जवळ जवळ आम्ही कधीच एकमेकांना चिटकून नसतो , तुम्ही आता Social Distancing  तुम्हाला सोसलं इतकंच पाळताय 
असो , तुम्ही काय जिवंत  माणसं आम्ही काय बाबा... आता हाडामासाची नसून फक्त हाडाची शरीर उरलेत फक्त निर्जीव शरीर ... 

खऱ्या आयुष्यत जात ,धर्म खूप वेळा पाहिलं  , पण या खोलीमध्ये एकदा शिरलो का ना कसली जात  आणि ना कसला धर्म मेल्यावर या जाती धर्माच्या जात्यात भरडले नाही हेच खर, 
पोर माझी आता तो A.C लावून झोपत  असतील ,पण आम्ही इथे बर्फाच्या लादीवर झोपतोय  , ती एक मज्जाच और बर्फाच्या लादीचा गोळा  खाल्ल्याने पुर्वी अंतर्मन गार पडायचं आणि मेल्यावर बाह्यशरीर गार पडतंय एवढाच काय तो फरक . 
पण एका अर्थी सुटलोच आम्ही हे जे आम्ही एवढ्या खोलीत आहोत ते , नाहीतर आता आमच्या कडून ते तुमचं Social Distancing  नसत जमलं , 
आमची ओळख हि अनोखी असते बर , साला जेव्हा शरीरात प्राण होता , तेव्हा कपाळावर ओळख असायची , पण आता त्या पायच्या अंगठ्याला बिल्ला लावलाय , तोच बिल्ला आता आमची काय ती ओळख , ना आम्हाला नाव ... ना काही 
आमची बदली हि  होते बर  एखाद्या  चांगल्या मेडिकल कॉलेज मध्ये , तिथेही आमची पुन्हा चिरफाड , आमची आम्हालाच बघवत नाही ... 
पण एक आहे , आमची शरीर मृत असली तरी आमचे आत्मे पारदर्शक आहेत , आणि मुळात म्हणजे आमच्यात अजून  Social Distancingआहे. 
 बर   झालं महामारी काळात माझं मरण नव्हतं , फरक  एवढाच आहे कि तेव्हा मरण घराच्या उबंरठयावर होत , पण आता हे मरण दाराच्या आत येऊन ठेपलय. शवविच्छेदन खोलीत आत्मा नसलेला देह सुद्धा Social Distancing   महत्त्व जाणू शकतो . पण या महामारीचे गांभीर्य नसणाऱ्या  तथाकथित लोकांना 
 Social Distancing  महत्त्व कधी कळणार ? असो 

  आणि माझी एक मलाच न पटलेली ओळख पारदर्शी आत्माच्या मनावर अगदी बळजबरीने बसलेली ओळख म्हणजे 'मुडदा' 
  
शव गृहातील एक मुडदा ?

चित्र - सिद्धेश अनंत कदम ... 
विशेष सहकार्य - दर्शना उर्मिला उल्हास क्षीरसागर ... 
लॆखन - श्रेयस रघुनंदन रोडे . 
तळा - रायगड - महाराष्ट्र 
मो - ८६००२३४६६३

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...