Friday, 9 October 2020

माझ अस्तित्व कुठेतरी नाहीस झालय...

 || श्री ||


  आमच अस्तित्व कुठेतरी नाहीस झालय...    
                   

                 मी एक कागदाचा तुकडा , माझा जन्म तसा खूप पूर्वी झालाय , आधी मी कुठल्या तरी पानाचा होतो , जग जस बदलत गेले तसा मी हि बदलत गेलो , पूर्वी मला पोह्चवण्यासाठी खास एक माणूस आसायचा , पूर्वी मला बोरू णे लिहायचे नंतर नंतर त्यातही बदल होत गेला , माझ्या वर काय काय लिहील , अजरामर ग्रंथ,अजरामर काव्य, मला तर तुम्ही माणसांनी एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून हि ठेवलय , पण माझ्यातले अनेक प्रकार काळानुसार बदलत गेले आणि बंद होत गेले , त्यातलाच पत्र हा व्यवहार आता पूर्ण पणे बंद होत चाललेला आहे . हल्ली पत्र फक्त जातात ती शाळेतून शिक्षकांनी त्यांच्या पाल्यांच्या पालकांना लिहिलेली . असो 
                        पूर्वी कस माझी एक वट असायची या घरातून त्या घरात मी दीमघात जायचो , कुठून कुठून मी यायचो , मला तुमच्या कडे सुपूर्त करणारा हि प्रेमळ आसायाचा एका विशिष्ट पोशाखात आसायाचा.  तो रोज सकाळी एक सबनम  खांद्यावर लटकवत एक रुबाबदार असलेला माझा तो साथी नाहीसा झालाय . मी त्या लाल पेटीत असायचो आणि मला त्या लाल पेटीतून काढल जायचं ... ते माझ घर ती पेटी हि इतिहास जमा झालेली आहे . हल्ली आमची ओळख एका पुस्तकाद्वारे हल्लीच्या पिढीला होते . ट - टपाल , प - पत्र  अशीच काय ती आमची ओळख ... 
  मी माझ अस्तित्व हरवलेलं एक पत्र बोलतोय ... 
मोबाईल वर आपण रोजच टाईप करत असतोच पण एकदा माझ्या अस्तित्वासाठी स्वता:च्या जवळच्या माणसाला पत्र ;इहून लिहते व्हा ... 
  तुम्हाला पूर्वी पटलेला आणि आता तुमच्यातून नाहीसा होत चालेला एक कागद ज्याला तुम्ही पत्र , म्हणता ...  













फोटोग्राफ - पद्मनाभ खोपकर -दिवेआगर 
लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे . 
            तळा -रायगड 
मोबाईल नंबर - ८६००२३४६६३ 

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...