|| श्री ||
स्पंदन...!
सायरनच्या आवाजात स्ट्रेचर वरून आत मध्ये एन्ट्री होते. सरळ icu मध्ये
भरती, त्या निर्जीव मशीनला जेवढे वायर्स
नसतात , तेवढे काही तासात त्या सजीव देहाला वायर्स ने जखडून टाकल होत, वरती सलाईन
होत्याच , काही तास सर्व चेकअप झाल , आणि बंधन पडली त्याच्याच त्याच्या खाण्यावर,
आजाराची रांग लागली. नातेवाईकांची बाहेरची कुजबुज ऐकू येत नव्हती , पण काहीतरी
त्याच्याच बद्दलच बोलण चाललय हे लक्षात आलं होत त्याच्या , तो थकला होता आता , एकट
एकट राहून , कुणाशीच संवाद नाही , शुल्लक
गोष्टीच tension आणि त्या tension मुळेच सर्व झालं, काही तासात सर्व शांतता झाली,
आता त्या icu मध्ये फक्त ते दोघेच होते, त्याच ते हृद्य आणि तो ...
ज्याचा मुळे त्याला एवढी बंधन पडली होती .ज्याच्या
मुळे त्याला एवढा त्रास झाला होता. अशा हृद्यासोबत तो एकटाच होता . त्याला
त्याच्यासोबतच राह्यच होत. कारण त्याने त्याचा विचार करण सोडल असत तर कदाचित तो
आता कुठल्यातरी स्मशानात असता आणि हेच सर्व बाहेरचे त्याच्या नावाने रडले असते ,
त्याच कौतुक हि तितकच झाल असत , जेवढ आता बाहेर कुजबुजण चालू होत कदाचित त्याहून
जास्त ,
त्याला आवाज आला आतून... ,
जरा ऐकल असतस तर कदचित हि वेळ आली नसती, तुला कधीच वाटल नाही कि माझ्याशी संवाद
साधावा, तू प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतोस, नको करत जावू इतका खोलवर विचार
अरे तुझ्या त्या खोलवर विचारामुळे मला हि ताण पडतो . मी तुझ्या आत असलो म्हणून काय
झाल , पण मिनिटाला जरा जास्त धडकलो तरी तुलाच त्रास आणि कमी धडकलो तरी तुलाच त्रास
... आम्ही फक्त तुझे साथी आहोत , पण मला एकटयाला त्रास झाला म्हणून बघ किती रांग
लागली आजाराची , थोडा संवाद माझ्या सोबत साधला असतास , तर या icu मध्ये आपण पडलो
नसतो. इतक्यात डॉक्टर आले , आणि एक मोठी सुई त्याच्या पोटात मारली , त्याच्या वेधना
मला पहावल्या नाही, पण न पाहण्यामुळे माझ्या धडकण्यात काही बदल झाला असता तर
बिचाऱ्याला त्रास, म्हणून मी काहीच केल नाही. डॉक्टर गेले , आणि तो शांत पडून
राहिला , माझ बोलण कदाचित त्याला ऐकू जात नसेल , पण बोलण तर भागच आहे ,
कारण तुम्ही माणस कधी आमच्या सोबत संवाद
साधत नाहीच , आम्ही २४ तास धडधडत असतो पण तुमच डिप्रेशन आणि tension यामुळेच आम्ही थकून जातो . माझ्या मुलाच भविष्यात काय होईल याचाच विचार तुझ्या डोक्यात
जास्त असतो . अरे तो अजून लहान आहे, नको
करू इतका विचार ...
| संवाद हृदयाशी ... |
आणि हाच खरा हृदयाशी संवाद असेल ...
चित्र - सिद्धेश अनंत कदम ...
लॆखन - श्रेयस रघुनंदन रोडे .