|| श्री ||
ती असते तेव्हा...
कधी भयाण आहे. तर कधी निथळ अगदी पाण्यासारखी अदृश्य पणे माझ्या मनाची तहान भागवणारी ,कधी तर ती इतकी भयाण होते , कि डोक्याच्या केसापासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सर्व डबडबून जात , ठोके वाढतात, तेवढी तिच्यामध्ये आहे ताकद .
बर हिची रूप हि वेगवेगळी आहेत .
मैफिलीत मिळते ती गझल ऐकून , मंदिरात मिळते ती मंत्र ऐकून .
मला शांतता हवे , बोचणारी नको , तिच्यासारखी सुंदर ,निरागस . हा पण भयान नको निथळ हवे अगदी झऱ्यासारखी दारू मध्ये आहे शांतता लपलेली ,पण तेवढ्यापुरती लिंगावाटे मुत्राच्या रूपाने ती बाहेर पडते काही वेळातच .
सिगारेट मध्ये आहे शांतता लपलेली एक दम मारल्यावर जी मनाला आणि ओठाना शांती मिळते ,ती शब्दात व्यक्त करूच नाही शकत , पण तरीही त्या धुरासोबत नाहीशी होते .
प्रेयशी बरोबर आहे शांतता , तिच्याकडे एकटक पाहत राहण्यात , अस काय पाहतोय रे ! या एका प्रेमळ वाक्यामुळे ती हि भंग होते , आणि भरकटते ती शांतता.
कुणाला प्रणयात ( SEX,ROMANCE ) मध्ये शांतता मिळते ,तर कुणाला कुणाची मारण्यात शांतता मिळते , कुणाला कुणाची मदत करण्यात शांतता मिळते, तर कुणाला रुचकर पदार्थ बनवून खाण्यात शांतता मिळते . कुणाला लिहीण्यात मिळते , तर कुणाला बोलण्यात मिळते ...
शांतता शांतता शांतता आणि फक्त शांतता
आपल्याला एखादा पदार्थ पहिला मग तो शाहाकार असो किंवा मग मांसाहार असो तो पदार्थ पहिला कि तो खाण्यासाठी जशी आपली लाळ टपकत असते ना , तसच हि शांतता कधी कधी आसुसलेली असते खाण्यासाठी , तिची हि लाळ टपकत असेल . ती कधी कधी इतकी बोचते आसुसलेल्या काल्पनिक नजरेने पाहत असते आणि अंधाऱ्या काळोखात ती दडलेली असते ...
शु... शांत बसा सगळे ,मला ना शांतता हवे ,प्याची आहे मला गटगट अशी शांतता ...
फक्त शांतता
लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे.
तळा - रायगड
८६००२३४६६३
चित्र १ - सिद्धेश अनंत कदम .
चित्र २ - साहिल बोथरे .

