Monday, 31 January 2022

वय वर्ष ४५

।। श्री ।। 

वय वर्ष ४५ 


    तोच तो नेहमीचा रूट ठरलेला , तेच शेड्युल आणि तिचं ती माणसं , हे सर्व सोडून  मुबंईत जावं  आणि तिथेच स्थयिक व्हावं असं वाटायचं , पण खरा मुंबईकर आता गांधीजींच्या आदर्श घेत म्हणत होता, चला खेड्याकडे पण खेड्यातलाच माणसाला ठाऊक खेडं काय ते ... 

        वय वर्ष ४५ असलेला मी माझ्याच तालुक्याचा MIDC मध्ये काम करत होतो १० हजार मध्ये घेतलेली सेकंड हॅन्ड बाईक दर महिन्याला तिला सजवत होतो. सर्व स्वप्न एका हृदयाच्या कप्यात ठेवली होती. बायकोचा स्पर्श झाला कि मी माझ्या स्वप्नातून बाहेर यायचो आणि तो स्वप्नाचा कप्पा लाजाळू सारखा मिटून जायचा , तिची तरी काय स्वप्न होती म्हणा , वर्षात एखादी साडी घेतली का ती खुश व्हायची , देवाच्या कृपेने एखाद मुलं असत तर ते एक बर झालं असत , पण बरं झालं आम्हाला मुलं झालं नाही ते १५ हजार पगारामध्ये पुन्हा त्या एकाची वाढ झाली असती . आणि त्याला सुद्धा इच्छा मारून जगायला लागलं असत . 


घरात माणूस किती हि ताठ मानेने जगत असला तरी तिथे त्याला आपल्या साहेबासमोर मान खाली करावीच लागते... 


रोज सकाळी ७ ते ७ करणारा मी संध्याकाळी घरी आलो का मेल्यासारखा पडलेला असतो , बायको जेव्हा  पाण्याचा ग्लास घेऊन येते , तेव्हा तिच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहिल्यावर दिवासाचा सर्व थकवा निघून जातो , घरात हि साधं मला काही करू देत नाही पण तिथे मात्र मी वेळेला  टॉयलेट देखील साफ करतो . आज पगार झाला म्हणून तिला साडी घेऊन आलो, पण तीने ती साडी घेताना मला विचारलं तुम्हाला काही घेतलं नाही का ? मी नकारार्थी मान डोलवली , 

उद्या सुट्टी घ्या , एक दिवस आपण फिरायला जाऊ या ! मी तसाच  माझ्या कामावर फोन लावला आणि विचारलं , तर सांगितलं कि अरे उद्या तुला डबल शिफ्ट आहे . 
ते ऐकून बिचारीची हिरमोड झाला , आणि मी पुन्हा माझ्या बारा तासाच्या शिफ्ट ला गेलो माझ्या बायकोचा मूड ऑफ करुन .... वयाच्या ४५ व्या वर्षी 


लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे . 

संकल्पना - सुरभी रवींद्र ठाकूर 



काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...