Monday, 19 September 2022

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।। 

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच... 

          कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता , पोटात भुकेने सर्वांच्या कावळे ओरडून धिंगाणा घालत होते . आणि  प्रत्यक्षात मात्र कावळा शिवत नव्हता , 
अरे बापाची शेवटची इच्छा काय होती का ? 

    एकजण अगदी कोकलून ओरडला , त्याला भूक लागली असावी बहुतेक पण तो तसा स्पष्ट बोलत नव्हता , नंतर नीट पाहिल्यावर लक्षात आलं कि हा आपलाच सवंगडी , एक पान  गळून पडल्यावर बाकीच्या पानांच्या मनाची तयारी होते कि आता आपण हि असेच गळून पडणार तसच त्याच हि झालं असावं बहुदा असो. मी काय तिथून जायला तयार नव्हतो आणि कावळ्याने हि ठरवलं होत कि आपण शिवायचं म्हणजे शिवायचं , पण तस प्रत्यक्षात होत नव्हतं . 

काळ बदलत जात होता , खऱ्या आयुष्या मधला जिवलग आज पित्र झाला होता ... 

पोराने तस सर्व ताट सायसंगीत भरून ठेवलं होत , आणि टेरेस वर सर्व सजवून ठेवलं होत , जिवंत असताना आपल्या बापाला काय आवडत हे माहित असून कधी कोण देत नाही , आणि आता वर ढगात गेल्यावर जावई पहिल्यांदा सासुरवाडीला गेल्यावर जस आदर तिथ्य होत अगदी तस करतात , आणि आज तरं जरा जास्तच ताट भरून ठेवलं होत ,

  पण आता काय उपयोग म्हणा , धाय मोकलून फक्त नावाला रडले , आता तर तस काहीच वाटत नाही आणि दिसत नाही . वेळ निघून जात होता आणि पोटातले कावळे आता बाहेर येतात कि काय असं लोकांना वाटत होत 
-शेवटी सुनबाई काहीतरी पुटपुटली त्याच्या कानात आणि तो मनातल्या मनात पुटपुटला,
-बाबा मला माफ करा  ,मी तेव्हा तस करायला नको होत , मी माझी पातळी सोडली , 
पण मला त्याची द्या आली नाही , मला त्या खोळंबलेल्या माणसांची दया आली ,  जे थांबले होते  हल्ली कोण एवढं कुणासाठी थांबतय , पण ते थांबले , असो 
कावळा  शिवला एकदाचा नाईलाजास्तव, पण मी मुक्त नव्हतो झालो का मी तृप्त नव्हतो झालो , कारण माझ्या मुलाने मला , माझा त्रास होत होता म्हणून मारलं ... 
शेवटी काकस्पर्श झाला , पण बाप मुक्त झाला नाही. 

मी भटकतोय एखाद्या जिवंत बैचेन  माणसासारखा मुक्ती च्या शोधात , 
आयुष्यात पुण्य किती हि करा पण आपल्या माणसांनी आपली व्यवस्थीत काळजी घेतली तरच आपण या ब्रह्मांडा मधून मुक्त होतो 



लेखन - श्रेयस रघुनंदन रोडे 
तळा -रायगड ८६००२३४६६३

 

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...