।। श्री ।।
कोरोना युद्धातील सेनापती मात्र दुर्लक्षित ...
आताच्या या बदललेल्या जीवनात आणि मुळात म्हणजे कोरोना सारख्या या महामारीच्या काळात जगावर खूप मोठं संकट आलेले असताना ... सगळे आपापल्या घरात बंद आहोत ,पण एक व्यक्ती अजूनहि घरी गेलेली नाही .
मी एकच व्यक्ती म्हणेन कारण माणूस हा एकच आहे . आत्मे वेगवेगळे असले तरी , मग तो पोलीस असो , एक सफाई कामगार असो किंवा मग एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट असो , म्हणून म्हटलं कि एक व्यक्ती .
ती व्यक्ती एखाद्या सेनापती सारखी लढत आहे , जागतिकस्तरावर चालू असलेला लढाईचा तो भाग आहे .
मात्र एक गोष्ट निदर्शनात आलीच ती म्हणजे आदर , मान ,सन्मान अहो एखाद्या सेनापतीला हे सर्व मिळतच, पण एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट , याना हे काहीच मिळत नाही ,नको मिळु द्या ते काय मान ,सन्मानासाठी एवढे भुकेलेले नाहीत , पण त्याच्यांकडे दुर्लक्ष तरी नका करू ...
मधल्या काळात इंदोर येथे डॉक्टर वर हल्ला झाला .... अरे ते या क्षणाला देवदूताचं काम करतात त्याच्यावर हल्ले कसले करताय ....
वेळ काय प्रसंग काय आपण करतोय काय कशाच कोणाला गांभीर्य नाही ...
![]() |
| राष्ट्र विजयी हो हमारा ... सर्वाना मानाचा मनापासुन मुजरा एक सफाई कामगार , आमचे पोलीस बांधव आणि डॉक्टर ( देवदूत ) |
हिम्मत लागते कोरोनाच्या रुग्णाच्या घशाचा swab घ्यायला आहे का कोणात एवढी हिंम्मत , पण ते एक डॉक्टरच करू शकतो . हिम्मत लागते त्या रुग्णाला इंजेक्शन ,सलाईन लावायला , ते काम फक्त नर्सच करू शकते ,
माझं तर ठाम मत आहे , हे देशाचं जागतिक पातळीवरील युद्ध आहे आणि यामध्ये खरा सैनिक खरा जवान हा एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट,एक पोलीस आणि एक सफाई कामगार आहे. जशी एखाद्या सैनिकांना बुलेट प्रूफ जॅकेट ची गरज असते ना तशीच माझ्या या जवानांना PPE किट सारख्या गोष्टीची गरज आहे . पण असो त्याना एक PPEकिट नाही भेटला तरी चालेल , पण देश जनता व मानव सभ्यतेच्या रक्षाणासाठी ते सुसज्ज आहेत आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे काळजी घेणे ,आता PPEकिट ची केले सुविधा पण जरा उशीरच झाला.
त्याच्यावर दुर्लक्ष करणे म्हणजे हि त्यांची काळजी नाही ?
वेगवेगळ्या बातम्या येतात , कोरोना विषयी पण त्या बातमीत एखादा डॉक्टर , एखादा पोलीस , एखादी नर्स असले ना कि वाईट वाटतं , कारण तो माणूस आपल्या साठी झटतो आहे .
अजूनही काही काही डॉक्टर , फार्मासिस्ट अजून आपल्या घरी गेले नाहीत , यामध्ये एक स्त्री देखील आहे मग ती डॉक्टर असो , एक फार्मासिस्ट असो , एक पोलीस असो , किंवा मग एक नर्स असो त्या माउलीला देखील तिचा संसार आहे प्रपंच आहे , पण तो सर्व सोडून देशासाठी आणि आपल्या साठी ती थांबली आहे ...
![]() |
| आज हे आहेत म्हणून आपण आहोत .... एक सलाम तुम्ही करत असलेल्या कामाला |
सर्व सेनापती आपापल्या क्षेत्रामधला डॉक्टर, फार्मासिस्ट , पोलीस, नर्स , सफाई कामगार ...
एवढं जोखमीचं काम फक्त हिच माणसं करू शकतात ...
प्रत्येक काम हे पैशासाठी नसत राव , त्याना सुद्धा सुट्ट्या आहेत ...
चित्र १ - सिद्धेश अंनत कदम
चित्र २ - कल्पेश काशिनाथ कदम
विशेष सहकार्य - कुणाल काळे
लॆखन - श्रेयश रघुनंदन रोडे .
तळा -रायगड मो - ८६००२३४६६३
दिनांक - १९ मे २०२०


Khup chan 👌👍
ReplyDelete👌👌👌keep it up
ReplyDeleteयोग्यच👌
ReplyDeleteAppreciated...👍
ReplyDelete👍
ReplyDelete🙏🙏🙏🙏
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteKhup mst
ReplyDeleteIts true
ReplyDeleterealistic Nice👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteअगदी बरोबर आहे
ReplyDeleteThanks aLl of
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👍🏻👍🏻
ReplyDelete