।। श्री ।।
शरीर सुन्न झालंय
अरे आओ ना , म्हणणारी ती आज भेटली मला तिच्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा खूप होती मनात पण ती व्यक्त होईल का याची , जरा मला शाश्वती नव्हती इतकंच , तिच्या भूतकाळातून ती वतर्माना मध्ये केव्हाच आली होती , पण तिला तिच्या भविष्याची चिंता होती ,तिचा भूतकाळ तिला सलत होता.
आम्ही भेटलो , आणि कुठल्यातरी शांत ठिकाणी जाऊ असं ती म्हणाली , मी म्हटलं ठीक आहे , आम्ही बस मध्ये बसलो , जरा जास्तच गर्दी होती बस मध्ये मी म्हणालो गर्दी आहे खूप , पण ती म्हणाली अरे सवय आहे मला या गर्दीची आणि या वर्दळीची, आम्ही चढलो आणि अचानक एका मुलीला एका व्यक्तींचा चुकून हात लागला, तर ती मुलगी जवळ जवळ त्याला मारायला च गेली , हिने स्मित हास्य देऊन त्या कडे दुर्लक्ष केलं , आणि अचानक हिला देखील जाणून बुजून हात लावला हे तिच्या हि लक्षात आलं आणि माझ्या हि लक्षात आल. पण एवढा हात लावून हि काहीच बोलली नाही .
तिकडच्या इतक्या लोकांमध्ये फक्त मलाच हीचा भूतकाळ माहित होता . आम्ही आता उतरलो आणि एका शांत ठिकाणी जाऊन बसलो , लिपस्टिक सतत लावून तिचे ओठ काळे पडले होते . शरीराच दर्शन देऊन तिचं शरीर आता वेगळंच वाटतं होत . परिस्थिती अभावी तिला हे करायला भाग पडलं होत . पण वेळेतच तिने तिचा मार्ग बदलला होता. आमचं बोलणं चालू होत , पण तिला मी त्या अवस्थेत पाहिल्यामुळे सतत माझ्या डोळ्यासमोर जुनी तीच येत होती . तिची ती शिवरी भाषा आता कोमल शब्दात मला रुचत नव्हती आणि असं तिच्या मनातलं जाणून घेणारा मी हा पहिलाच होतो . मी हि त्या लोका मधलाच होतो . पण मी एक हिचा मित्र होतो .
![]() |
| तो एक सुन्न करणारा अनोळखी स्पर्श |
तिला विचारलं मी , मगाशी बस मध्ये तुला तो स्पर्श वेगळा नाही जाणवला का ? मग तू काही बोलली का नाहीस .
ती म्हणाली शरीर सुन्न झालय ,
आणि ती उठून निघून गेली , तिच्या भविष्याकडे
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8024637492767180"
crossorigin="anonymous"></script>
लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे ...
तळा - रायगड
चित्र - सिद्धेश अनंत कदम ...

सुरेख लेखन
ReplyDeleteछान अप्रतिम कमी शब्दात सुरेख विचार मांडलेत
DeleteKammal👌
ReplyDeletethank u ...
DeleteMst👌
ReplyDeletethank u
Deleteअप्रतिम, कमी शब्दांत खूप मोठा आशय व्यक्त केला आहे. छान.👌👌👌
ReplyDeletethank u subhas sir
Deleteछान लिहिलं आहे... पण अजून थोडं वाढवता आलं असतं... 👍🏻👍🏻
ReplyDeletethank u sir.. next blog la try karen...
Deleteखूपच छान ... महत्वाच्या विषयाला अगदी सहज पणे हात घातला आहे...
ReplyDeleteNice end
ReplyDeletethank u nikita
DeleteNice
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeletehttps://www.myselfabhi.in/2021/07/blog-post.html
ReplyDelete